युवकाचा मृतदेह आढळला

0

भोर । पुणे- सातारा महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावरील करंदी खेडे बारे येथे डोंगरात अनोळखी अर्धनग्नावस्थेत कुजलेला मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अंदाजे 35 वर्षे वयाच्या युवकाचा हा मृतदेह आहे. मृतदेहाजवळ पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, मोटर सायकलचे स्मार्ट कार्ड, अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम कार्ड सापडले असून सापडलेल्या कागदपत्रावर श्री असरीत पॉलीकॉर्न केअरकटटा (रा. मध्यप्रदेश) असे पत्ता आहे. या बाबत पोलिसांनी वरील पत्त्यावर संपर्क साधून नातेवाईकांना याची माहिती दिली आहे. तसेच या नावाचा व्यक्ती गेली दोन तीन महिन्यांपूर्वी हरवल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो कुजलेल्या अवस्थेत आहे. याबाबत अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. तलवार, पोलीस नाईक नितीन रावते, पोलीस नाईक एस. ई. होळकर व त्यांचे सहकारी करीत आहे.