युवकाची आत्महत्या, 6 जणांविरुद्ध गुन्हा

0

लोहारा – तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन जावळे (वय 27) हा तरुण तीन दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र, त्याने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्याचे उघड झाले. पवन याचे वडील बालाजी जावळे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना संबंधितांवर गुन्हा दाखल करावा लागला असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील कानेगाव (जि.उस्मानाबाद) येथे ही घटना उघडकीस आली होती.

अशी आहे घटनेची पार्श्‍वभूमी
3 जून रोजी मयत पवन हा ट्रॅक्टर मागे घेत असताना विद्युत पोल पडला. यावरून संजय प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद कांबळे यांच्या दोन मुली, लातूर येथील जावई आणि बाळासाहेब कांबळे यांनी त्यास मारहाण केली तसेच याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास तुझ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यामुळे पवन याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे. यावरून वरील सहाजणांविरुद्ध भादंवि कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पो.नि. फुलचंद मेंगडे करीत आहेत.