धुळे । येथील वैद्यकीय प्रतिनिधी असलेल्या एका तरुणाने काल सायंकाळी तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. तत्पुर्वी त्याने भावाला आणि मित्राला फोन करुन ही माहिती दिल्याने तत्काळ त्याचा शोध सुरु झाला. तथापी, आज सकाळी सदर तरुण मृतावस्थेत आढळून आला.
वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून करीत होता काम
चाळीसगाव रोडवरील पश्चिम हुडको परिसरालगत असलेल्या राजेशिव कॉलनीत राहणार्या हितेंद्र ऊर्फ सोनु दिलीप तापीत उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली. दुसाने हा 29 वर्षीय तरुण वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. काल तो शिरपूर येथे मोटरसायकलीने गेला होता. सायंकाळी धुळ्याकडे परतांना 5.30 वाजता तो तापी नदीपुलावर थांबला. तेथुन त्याने भावाला आणि मित्राला फोन करुन मी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. भावाने त्याला फोनवरच समजविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याने स्वतःला तापी नदीपात्रात झोकून दिले.
मच्छिमारांनी सकाळी काढले शोधून
दरम्यान, हितेंद्र दुसाने याच्या भावासह काही लोकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र रात्रीच्या अंधारात हितेंद्रचा शोध घेणे कठीण झाल्याने आज पहाटे पासून पुन्हा शोध मोहिम सुरु करीत परिसरातील मच्छिमारांनी हितेंद्रला सकाळी 7.30 वाजता शोधुन काढले. यावेळी हितेंद्रच्या पँटमधील खिशात पैशांचे पाकिट आणि मोटरसायकलची चाबी सापडली. या व्यतिरिक्त काहीही सापडले नाही. हितेंद्रचे पार्थिव धुळ्यात आणून जिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ते नातलगांच्या ताब्यात दिले. तुर्तास या घटनेची पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाला आहे.