युवकाच्या खून प्रकरणात पोलीस अधिकार्‍यांना सहआरोपी करा

0

धुळे । साक्री रोडवरील भीमनगर परिसरात गुटखापुडीच्या दरामुळे वाद होवून मरण पावलेल्या युवकाच्या गुन्ह्यात अन्न व औषध प्रशासनातील कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांना सहआरोपी करावे, अशी मागणी लोकसंग्रामने केली असून तसे निवेदन शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आले. निवेदन देतांना लोकसंग्रामचे तेजस गोटे, अ‍ॅड.नितीन चोरडीया, अमोल सुर्यवंशी, मनोज वाल्हे, डॉ.अनिल पाटील, सचिन सुर्यवंशी, शकील खजुरवाले, छोटू गवळी, नाना पाठक, खलिल अन्सारी, अभिमन्यु बच्छाव, राजेंद्र वरुटे, किशोर चौधरी,भगवान जिरेकर, कपील अन्सारी बाळु शेंडगे, शिवाजीराव पाटील, प्रविण राणा, जावेद किराणा, दिपक जाधव, सचिन पोतेकर, आदी उपस्थित होते.

वारंवार निवेदनाद्वारे मागणी
तत्पुर्वी ल.अ.दराडे यांच्याशी लोकसंग्रामने भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली होती. तरीही कारवाई न झाल्याने 4 जुलै रोजी राजीव गांधी नगरातील संदीप ठाकुर या तरुणाचा गुटखा पुडीच्या दरावरुन वाद झाल्याने खून करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात लोकसंग्रामला अन्न औषध प्रशासनाविरुध्द साक्षी,पुरावे देण्याची तसेच दराडे व पवार या दोघा अधिकार्‍यांना सहआरोपी करण्याची मागणी लोकसंग्रामने केली आहे.

शहरात सर्रास गुटखा विक्री
शहरात गुटखा सर्रास विकला जातो याला आळा घालावा म्हणून लोकसंग्रामने गेल्या सात महिन्यांपासून तगादा लावला आहे. याविरोधात आंदोलनाचा इशारा देवूनही अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, एका तरुणाचा बळी गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी त्याच्या तपासात अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्‍यांविरुध्द साक्षी, पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी. ज्या अधिकार्‍यांनी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसमवेत झालेल्या बैठकीत आश्‍वासन देऊनही कारवाई न केल्याने त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी केली आहे.