शिरपूर। तालुक्यातील वाघाडी शिवारात शिरपूर – शहादा रोडवर शुक्रवारी भरधाव वेगाने जाणार्या टोयाटो गाडीने मोटार सायकलला जोरदार धडक दिली होती .या अपघातात एक ठार व एक जखमी झाला होता. या बाबतवाहन चालकांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गून्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाघाडी शिवारातील शिरपूर -शहादा रस्त्याने टोयाटो (एम.एच.18- ए.जे.1817 ) ही गाडी भरधाव वेगाने येत असतांना तीने मोटार सायकल (एम.एच.41 ए.एफ. 8183) हिला जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल लक्ष्मण कुमावत (32) हा ठार झाला. तर डिंगबर हिरामण राजकुवंर हा गंभीर जखमी झाला होता. दोघही नाशिक जिल्ह्यांतील सटाणा तालुक्यांतील ब्राम्हणगाव येथील रहीवासी आहेत. याबाबत विकास कृष्णा कुमावत यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन टोयाटो चालक पद्माकर योगराज पाटील रा.प्लाँट नं 40 सुभाष काँलनी शिरपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.काँ.चौधरी हे करीत आहेत.