डोळ्यांवर काळी पट्टी बांधून रिक्षात मारहाण
जळगाव । युवकाची लुटमार करून त्यास अज्ञात व्यक्तींनी रिक्षात फिरवून मारहाण करून त्याचे पैसे व मोबाईल हिसकावून घेतले होते. याप्रकरणी पोलीसांनी चौकशी करून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. विवेक राजेंद्र पाटील (वय १९ रा. सावखेडा खुर्द. ता. जळगाव) यास १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात एका रिक्षाचालकाने त्याचे सोबत असलेल्या प्रथम बसलेल्या व त्यांचे नंतर बसलेले दोन असे ४ व्रक्तींनी स्वत:च्या तोंडाला रुमाल बांधून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रिक्षेत फिर्यादीचे डोळ्यांवर काळीपट्टी बांधून रिक्षेत फिरवून मारहाण करून अज्ञात जागेवर नेवून त्यांच्या पॅन्टच्या खिशातुन मोबाईल आणि मनीपर्स जबरीने चोरून त्यास पांडे डेअरी चौकात उतरवून दिले.
जिल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यागुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्था.गु.शाखेला दिले होते. त्याप्रमाणे सपोनि संदीप आराक, स.फौ.नुरोदीन शेख, दिलीप येवले, विजय पाटील, रा.का.पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चौधरी, नरेंद्र वारूळे आदींच्या पथकाने शहरातील सर्व रिक्षा थांब्यावर निगराणी ठेवून रिक्षाचालकांची विचारपुस केली. या चौकशीत अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या जवळून जबरीचोरीत गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना जिल्हापेठ पोेलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.