युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात

0
जिल्हा निवडणुक अधिकारी विजय चौधरी यांची माहिती
जळगाव- काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आॅनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे मथुरा येथून आलेले जिल्हा निवडणुक अधिकारी विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
युवक काँग्रेसच्या निवडणुक प्रकियेसंदर्भात माहिती देण्यासाठी काँग्रेस भवना बुधवार, २२ रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली़ यावेळी जिल्हाध्यक्ष पराग पाटील, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, प्रा.हितेश पाटील, अमोळ माळी, सुरेंद्र कोल्हे आदी उपस्थित होते़ विजय चौधरी पूढे म्हणाले की, युवक काँग्रेसची निवडणुक मागील महिन्यातच जाहिर करण्यात आली होती़ त्यानुसार सभासद नोदणी देखील झालेली आहे़ मतदार याद्यही आॅनलाईन पध्दतीने प्रसिध्द झाल्या असून २२ ते २५ आॅगस्ट या कालावधीत याद्यांची छाणणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल़ दरम्यान, इच्छुक उमेदवारांना २२ ते २६ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली़
५ जागांसाठी निवडणुक 
प्रदेशस्तरावर प्रदेश अध्यक्ष व महासचिव तसेच जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्ष व महासचिव तसेच एक तालुकाध्यक्ष अशा ५ जागांसाठी ही निवडणुक घेतली जाणार आहे़ निवडणूक सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ तोच ५ हजार मतदार हे मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ २७ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्जावर हरकत नोंदवता येणार असून २८ आॅगस्टला चिन्ह वाटप होणार आहेत़
निवडणुकसाठी सभासदांना मतदान करता येणार आहे़ त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील सभासदांना मतदान कक्षात ठेवलेल्या एका टॅबवर क्लिक करून मतदान नोंदविता येणार आहे़ यानंतर मतदान होताच अर्धा तासात निवडणुकीचा निकाल जाहिर केला जाणार असल्याचे जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी सांगितले़