शिक्रापूर । हिवरे येथील युवा व सामाजिक कार्यकर्ते धनंजय आर्वेकर यांची नुकतीच शिरूर तालुका युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. आर्वेकर यांनी यापूर्वी केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी संतोष काळे, संतोष पटेकर, अप्पा महाजन व काँग्रेसचे सभासद उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे ध्येये आणि उद्दिष्टे समोर ठेऊन काम करणार असल्याचे आर्वेकर यांनी या निवडीबाबत बोलताना सांगितले.