युवक कॉंग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी प्रा.मुक्तदीर देशमुख यांचा विजय

0

जळगाव: महाराष्ट्रात ९, ११,१२ सप्टेंबरला युवक कॉंग्रेसच्या निवडणुका घेण्यात आल्या. १३ सप्टेबरला जिल्हा कमेटीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. प्रदेश कमेटीचा निकाल शुक्रवारी १५ सप्टेंबरला नागपूर येथून जाहीर करण्यात आला. युवक प्रदेश कॉंग्रेससाठी महासचिव या पदासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रा.मुक्तदीर देशमुख एकमेव उमेदवार होते त्यांनी विजय प्राप्त केला. मुक्तदीर देशमुख यांचा विजय झाल्याने जिल्हा कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेस तर्फे कॉंग्रेस भवन आवारात आतिषबाजी करण्यात आली.

राज्यातून मतदान करणाऱ्या युवक/युवतींचे आणि मदत करणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. माझा विजय जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचा विजय असल्याचे प्रा.मुक्तदीर देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रा.मुक्तदीर देशमुख यांचा परिचय -टोपण नाव बाबा देशमुख, धरणगाव तालुक्यातील रहिवासी, हल्ली जळगावात वास्तव्य, उच्च शिक्षित, प्राध्यापक, विविध भाषांवर प्रभुत्व, पक्षात मास्टर ट्रेनर, राष्ट्रीय स्थरावर पक्षासाठी कार्य, शिक्षण संस्थेत पदाधिकारी, हजारो तरुणांना नोकरी आणि उद्योग प्राप्त करून दिला.