तळोदा: स्वामी विवेकानंद जयंती पासून नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती या दरम्यान साजरा केला जाणाऱ्या युवक सप्ताहाचा समारोप करण्यात आला. त्या निमित्त आज तळोदा शहरात भव्य अशी २५२ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अभाविपच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेत शहरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिक, व प्राध्यापक उपस्थित होते. तिरंगा पदयात्रेची सुरुवात न्यू हायस्कूल चिनोदा रोड येथून करण्यात आली, बस स्टॉप, स्मारक चौक, आनंद चौक, वामन बापूजी मंगल कार्यालय येथे जावून व्याख्यान करून समारोप करण्यात आला.