शिरपूर। आजकल वाढत्या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होत असल्याने अनेक प्रकारच्या वाईट घटना समाजात घडत आहेत.यामुळे आज युवतींना चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आजकालच्या मुली शिक्षणासह प्रत्येक गोष्टींमध्ये चणाक्ष आहेत. मुलींनी आपली क्षमता ओळखून जगाला जिंकावे असे मार्गदर्शनातून प्रशिक्षक चंद्रकांत गुलवाडे यांनी उपस्थित युवतींना सांगितले.
तुलना करणे हा प्रकार थांबविणे गरजेचे
मुलींनी एकमेकींबरोबर स्वत:ची तुलना करणे हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. आज मी जशी आहे तशीच आहे हे मनात ठाम करणे गरजेचे आहे. तुमच्याजवळ गुणवत्ता आहे ती गुणवत्ता फार मोठी आहे. याची जाणीव ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामुळे आत्मविश्वास वाढेल शिवाय आहे त्या क्षेत्रात यश मिळेल. मुली ज्या परिसरात किंवा भागात राहतात .त्यानुसार त्यांनी त्या संस्कृती चे स्वीकार करणे गरजेचे आहे.
युवती सक्षमीकरण शिबिर
शिरपूरात भारतीय जैन संघटना मार्फत निशुल्क युवती सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय शिबीर आहे. शिबीरास शनिवारी सुरुवात झाली.याप्रसंगी युवतींना मार्गदर्शन करताना गुलवाडे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली.अकोल्याचे प्रशिक्षक चंद्रकांत गुलवाडे यांचा सत्कार शहरातील जवाहरलाल पारख, भिकचंदजी खिंवसरा , नवनीत राखेचा , राजेंद्र पारख, विजय बाफना, विभागीय सचिव प्रा.सि.डी.डागा , अशोक राखेचा , गणेश कोचर आनिल बाफना , अशोक बाफना , नवनीत चोरडिया , राकेश संकलेचा, सुमित शेठिया , या उपस्थित मान्यवरांनी केला.
पालकांनाही मार्गदर्शन करणार
त्यामुळे अनुचित प्रकारांना सामोरे जावे लागणार नाही.बरेचसे गैरप्रकार ऐकायला मिळतात आणि तेच क्रूत्य जवळच्या व्यक्तीकडून होत असल्याचे सांगितले. अनुचित प्रकार होत असेल तर घरातील वरिष्ठांना कळवा. जेणेकरून आपल्या वाटेला येणार नाही. शिबीर समारोपाप्रसंगी युवतींबरोबर त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन करणार आहेत. काही टिप्सही पालकांना देणार आहे. यावेळी शिबीरात प्राची बाफना, पुजा भंडारी, स्नेहल बेदमुथा, वैष्णवी ओसवाल, पलक ललवाणी, अंकीता पारख, अंकीता बाफना, किर्ती बाफना, पायल ललवाणी, पुजा ललवाणी, पुजा सांडेचा, अंजली डागा , सभ्यता चोरडिया, दिक्षीता कांकरिया आदी उपस्थित होत्या.