हैदराबाद । सलामी लढतीत 62 धावा ठोकणार्या युवराजच्या खेळीची सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मुक्तकंठाने प्रशंसा केली. सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला, ‘मी टीव्हीवर ज्याला पाहायचो तोच हा खरा युवी आहे. त्याने फटकेबाजी आणि शैलीदार स्ट्रोक्स यांचा नमुना सादर केला. तो असाच खेळत राहावा अशी आमची इच्छा आहे. युवीने स्पर्धेत सहा किंवा सात वेळा कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास अंतिम फेरी हमखास गाठू. नंतर जेतेपदही कायम राखू शकतो.’
या खेळी आपण प्रभावित झालो असल्याचे त्याने सांगितले. युवराजसिंगचा फलंदाजीतील झंझावात संपूर्ण पर्वात कायम राहिल्यास आयपीएलचे पुन्हा जेतेपद पटकविणयाचा विश्वास सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने व्यक्त केला. सलामीला शिखर धवनने 40 धावांचे योगदान दिल्याबद्दल वॉर्नरने समाधान व्यक्त केले. याशिवाय अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशिद खान याच्या पदार्पणातील कामगिरीमुळे आपण प्रभावित झाल्याचे मत वॉर्नरने मांडले.