युवादिनी एड्सबाबत जनजागृती मोहीम

0

मुंबई। जागतिक युवा दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये, विद्यालयातून एड्सबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्याच बरोबर युवा दिनाच्या निमित्ताने शहरात एड्सग्रस्त बालकांसाठी आणि एडस्ग्रस्तांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाशीतील मनपा रुग्णालयात व आय.सी.एल. महाविद्यालयात जागतिक युवा दिनाचे औचित्य साधत एडस या आजारावर जनजागृती करण्यात आली. युवा दिनविशेष आयोजन पालिका रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, सुरक्षा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. एडस् या आजाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी वाशीतील आय सी एल कॉलेजमध्ये एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांकडून मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय भविष्यात असे आजार होऊ नये यासाठी विध्यर्थ्याना माहिती परिपत्रके वाटण्यात आली. एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्यातर्फे युवा दिनानिमित्त वाशीतील आयसीएल कॉलेजमध्ये युवक व एच.आय.व्ही. ग्रस्तासांठी सेवा सुविधा, एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम डेंगू ताप रक्तदान आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.