शहादा । रुवारंग कार्यक्रमात वसंतराव नाइक महाविद्यालयाची छाप तब्बल दहा बक्षिस पटकावित उपस्थितांचा मनावर छाप सोडली. येथील पुज्य साने गुरुजी चा प्रांगणात नंदुरबार जिल्ह्यातील युवा रंग कार्यक्रम नुकताच जल्लोषात पार पडला. यशस्वी विद्यार्थ्यांचे सस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, प्राचार्य डॉ.पाटील, समन्वयक संजय राजपुत, उपप्राचार्य डॉ.एच.एस.पाटील, आर.बी. मराठे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्याना सांस्कृतिक मंडळ व प्राध्यापक वर्ग यानी मार्गदर्शन केले. त्यात शहादा येथील वसंतराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालयाने तब्बल दहा बक्षीस पटकाविली त्यात चार प्रथम क्रमांकाची होती तर द्वितीय क्रमांकाची तीन तृतीय क्रमांकाचे एक तर उत्तेजनार्थ प्रथम दोन अशी एकुण 10 बक्षीस मिळ्वीली. विडंबनात प्रथम रोशनी बेलदार, भारतीय लोकगीत प्रथम मनोज शर्मा, शास्त्रीय ताल वाद्य तबला प्रथम गोपाल रोकडे, काव्य वाचन प्रथम हिमांशु संजय जाधव, फोटोग्राफी द्वितीय दिपक पानपाटील, वव्क्तृत्व द्वितीय लिना पाटील, वाद विवाद द्वितीय रोशनी बेलदार व लिना पाटील, क्ले मॉडलींग तृतीय पुनम खर्डे, सुगम गायन उत्तेजनार्थ प्रथम योगेश्वरी माळी, स्कॉट पेंटींग उत्तेजनार्थ प्रथम गोरख पावरा यांना बक्षिसे मिळाले आहे.
निकाल खालीलप्रमाणे
संगीत शास्त्रीय गायन – प्रथम शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयाय, व्दितीय जीटीपी महाविद्यालय शास्त्रीय तालवाद्य- प्रथम नाईक महाविद्यालय, सुगम गायन . प्रथम शहादा महाविद्यालय, व्दितीय बाबखेडा महाविद्यालय, तृतीय तळोदा महाविद्यालय तर उत्तजनार्थ -नाईक महाविद्यालय औषध निमार्ण महाविद्यालय.
पाश्चात्य सुगम गायन- शहादा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम, व्दितीय शहादा महाविद्यालय,
समूहगान-प्रथम शहादा महाविद्यालय, व्दितीय बी.एड.महाविद्यालय नंदुरबार, तृतीय शहादा अभियात्रिकी महाविद्यालय, उतेजनार्थ जीटीपी महाविद्यालय नंदुरबार व विसरवाडी महाविद्यालय,
पाश्चात्य समूहगीत- प्रथम शहादा महाविद्यालय,
लोकसंगीत – शहादा महाविद्यालय प्रथम, व्दितीय जीटीपी महाविद्यालय.
भारतीय लोकगीत- प्रथम नाईक महाविद्यालयात, व्दितीय जीटीपी महाविद्यालय, तृतीय शहादा महाविद्यालय, उतेजनार्थ शहादा व खापर महाविद्यालय.
समूह लोकनृत्य – प्रथम जीटीपी महाविद्यालय, व्दितीय जिजामाता महाविद्यालय, तृतीय जी.एफ.पाटील महाविद्यालय, उतेजनार्थ मोलगी महाविद्यालय व धडगाव महाविद्यालय. नृत्य शास्ञीय नृत्यात प्रथम पी एस जी व्ही पी एस चे औषध निर्माणशास्ञ महाविद्यालय शहादा,
साहित्य कला वक्तृत्वात – प्रथम पूज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा, व्दितीय वसंतराव नाईक कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा, तृतीय पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे पाटील कला, विज्ञान आणी वाणिज्य महाविद्यालय शहादा, उतेजनार्थ पहिले औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा, दुसर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार,
साहित्य कला – प्रथम पाटील महाविद्यालय शहादा, व्दितीय नाईक महाविद्यालय शहादा, तृतीय शहादा औषध निर्माण महाविद्यालय, उतेजनार्थ शहादा अभियांत्रीकी महाविद्यालय व नंदुरबार विधी महाविद्यालय.
काव्य वाचन- प्रथम नाईक महाविद्यालय शहादा, व्दितीय जीटीपी महाविद्यालय, तृतीय अक्कलकुवा महाविद्यालय, उतेजनार्थ पाटील महाविद्यालय शहादा व शहादा औषध निर्माण महाविद्यालय,
ललित कला (क्लेमॉडेलिंग)- प्रथम आर.एफ.एन.एस. महाविद्यालय अक्कलकुवा, व्दितीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापुर, तृतीय वसंतराव नाईक महाविद्यालय नंदुरबार, उतेजनार्थ प्रथम समाजकार्य महाविद्यालय तळोदा, उतेजनार्थ कला. विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा.
ललित कला (स्पॉट पेंटिग)- प्रथम जीटीपी महाविद्यालय नंदुरबार, व्दितीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा, तृतीय पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा. उतेजनार्थ प्रथम वसंतराव नाईक महाविद्यालय नंदुरबार, उतेजनार्थ दुसरे चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार.
ललित कला (फोटोग्राफी) – प्रथम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा. व्दितीय वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, तृतीय जीटीपी महाविद्यालय नंदुरबार. उतेजनार्थ प्रथम आयएमआर आणि डी शहादा, उतेजनार्थ व्दितीय चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार.
ललित कला (इन्स्टोलेशन) – प्रथम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापुर, व्दितीय आयएमआर आणि डी शहादा तृतीय, जामाचा अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था अक्कलकुवा, उत्तेजनार्थ प्रथम जीटीपी महाविद्यालय नंदुरबार, उत्तेजनार्थ दुसरे वरिष्ठ महाविद्यालय अक्कलकुवा.
नाट्यकला विडंबननाट्य -प्रथम वसंतराव नाइक महाविद्यालय शहादा, द्वितीय जीटीपी महाविद्यालय नंदुरबार, तृतीय पुज्य साने गुरुजी महाविद्यालय लोणखेडा, उत्तेजनार्थ कला व वाणिज्य विद्यालय नवापुर, उत्तेजनार्थ दुसरे पटेल अभियांत्रिकी विद्यालय शहादा.
नाट्यकला मुकनाट्य – प्रथम कला व विज्ञान महाविद्यालय नवापुर, द्वितीय पटेल अभियांत्रिकी विद्यालय शहादा, तृतीय शहादा, उत्तेजनार्थ पहिले विज्ञान व कला महाविद्यालय शहादा , दुसरे जीटीपी महाविद्यालय नंदुरबार.
नाट्यकला मिमिक्री – प्रथम पटेल अभियांत्रिकी विद्यालय शहादा, द्वितीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा, तृतीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापुर, उत्तेजनार्थ जामियाची अभियांत्रिकी विद्यालय अक्कलकुवा.
दुसरे मोलगी कला प्रकार
ललित कला (रांगोळी) -प्रथम नवापुर, द्वितीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा, तिसरे एस.टी.को. ऑफ महाविद्यालय शहादा उत्तेजनार्थ अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा, दुसरे जीटीपी महाविद्यालय नंदुरबार.
ललित कला चित्रकला – प्रथम जीटीपी महाविद्यालय नंदुरबार. दुसरे बामखेडा तृतीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा, उत्तेजनार्थ पहिले पुज्य सानेगुरुजी महाविद्यालय शहादा, द्वितीय अभियांत्रिकी विद्यालय शहादा. ललित कला कॉलेज – प्रथम पुज्य साने गुरुजी महाविद्यालय शहादा, द्वितीय अक्कलकुवा, तृतीय अभियांत्रिकी विद्यालय लोणखेडा, उत्तेजनार्थ प्रथम कला व विज्ञान महिला महाविद्यालय शहादा, द्वितीय एस टी को ऑफ महाविद्यालय शहादा.
व्यंगचित्रात – प्रथम पुज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाचे पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा. व्दितीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा. तृतीय जामियाची अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्ञ संस्था अक्कलकुवा. उतेजनार्थ पहिले नवापुर शिक्षणशास्ञ महाविद्यालय.
नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हा
शहादा (प्रा.गणेश सोनवणे)। या जिल्ह्याचा आदिवासी संस्कृतीची ओळख झाली नाही तर नवलच ..! त्याच संस्कृतीची ओळख आणि संदेश देत होळी नृत्य, शिबली नृत्य, देवमोगरा मातेची आराधना करणारे नृत्य आणि आदिवासी समाजातील लग्नात नाचले जाणारे नाचा ये जा रे – डबडा वाजारे …, डोले वाजे हे, भिंगर्या वाजे हे या नृत्याने उपस्थितांची दाद मिळवितानाच शेतकरी नृत्य आणि तु दुर्गा – तु भवानी , संसाराची तुच जणनी या लोकनृत्यांनी धमाल उडवित रसिक प्रेक्षकासह आख्या तरुणाईची टाळ्याचा गजरात व्हा व्हा मिळविली. रंगमंच एक वर युवारंगातील सळसळती तरुणाईची थिरकणारी पावले, उत्साह आणि चैतन्याचा नवा जोष लोकनृत्याचा कला विष्काराची अनोखी झलक उपस्थितांची दाद मिळवुन गेली विद्यार्थी व विद्यार्थीमधील लपलेले सुप्त गुण त्यातुन बाहेर पडले. आदिवासी समाजातील विविध छटांचा संगम घालीत त्यांच्या संस्कृतीचे जतन करणार्या कला गुणांचे होळी, शिबली, ढोल नृत्य आणि देवमोगरा देवीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य सोबतच आदिवासी बोली भाषा आणि त्यांचा पेहरावाचे दर्शन युवा रंगाचा व्यासपीठावरुन सादर करण्यात आले. यासोबतच शेतकरी नृत्याची देखील सांगड एका संघाने घातली भलर धनगरी राजा भलर अस आव्हान करीत तिफन घेवुन उभ्या शेतात पिकांच रक्षण करणार शेतकरी नृत्याने सर्वाना मोहीत केले. तु दुर्गा, तु भवानी, संसाराची तुच जननी आंबेकरी कृपा या धार्मिक नृत्यातील युवतींचा कलाबिष्कार अफाट होता. त्यांचातील कलागुणांनी अन्य विद्यार्थ्यानाही प्रोत्साहीत करतानाच रसिक प्रेक्षकामध्ये धमाल उडवुन दिली. ढोल बासरीची धुण, घुंघरूची छनछन त्यावर थितकणारुया तरुनाईचा अविष्कार यातुन शहादा महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला.