युवाशक्ती फाउंडेशनची गणेशोत्सव कार्यकारिणी घोषीत

0

जळगाव। युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवासाठीची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. श्री स्वामीसमर्थ केंद्र संयुक्त विद्यमाने रविवार 3 सप्टेंबर रोजी भव्य अर्थवशिर्ष पठनाचे आयोजन काव्यरत्नाजली चौक येथे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील किमान 3500 गणेशभक्त सहभागी होणार आहेत.

अशी आहे कार्यकारिणी
अध्यक्ष – नवल गोपाल, उपाध्यक्ष – संदीप सूर्यवंशी, सचिव – अमोल सोनवणे, सहसचिव – पियुष हसवाल, खजिनदार – शिवम महाजन, सहखजीनदार – साहिल साळी, कार्यध्यक्ष -विनोद सैनी, सहकार्याध्यक्ष- तेजस दुसाने, पियुश तिवारी, सभासद प्रमुख- मितेश गुजर, सरचिटणीस- पंकज सुराणा, उपसरचिटणीस- सुमंत माळी, पियूष दोशी, दिपक धनजे, निमंत्रक- मंजित जांगीड, जितेंद्र अत्तरदे, तेजस जोशी, रघुनाथ राठोड, प्रसिध्दी प्रमुख- वैभव पाटील, शुभम बियाणी, अंजली चोरडीया, अर्पिता पाटील, शिवाजी कावडीया, कल्पेश पाटील, भवानी अग्रवाल, हितेश पाटील, रोहित सोनार, विकास अत्तरदे, तेजस वांद्रे, पृथ्वी मैनपूरी, अनुराम शर्मा, यश श्रीश्रीमाळ, तेजस श्रीश्रीमाळ, सौरभ चातुर्वेदी, समिर कावडीया, सागर जगताप, मोहित शर्मा, विराज कावडिया, विपिन कावडीया, भूषण सोनवणे, अमित जगताप, भरत झांबरे, राहुल चव्हाण, दिपेश फिरके, कल्पेश श्रीश्रीमाळ, गणेश भोई, पवन चव्हाण, राहुल शिंपी, तुषार गायकवाड, प्रशांत गायकवाड, हितेश अग्रवाल, जितेंद्र जैन इत्यादी . 10 दिवस विविध कार्यक्रम उदा. किर्तन, पथनाट्य, तृतीय पंथीयांच्यातर्फे आरती, भजनसंध्या, लहान मुलांसाठी स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे.