युवाशक्ती फाऊंडेशनची कार्यकारिणी जाहीर

0

जळगाव । युवाशक्ती फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकाची नुकतीच बैठक काव्यरत्नावली चौक येथील भाऊंचे उद्यान येथे रविवार 26 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. ही बैठक गिरीश कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवाशक्ती चे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रा. राजेश जाधव, सचिव अमित जगताप व राजेश नाईक आदी उपस्थित होते. ह्या बैठकीत वर्ष 2016 मध्ये युवाशक्ती मार्फत केल्या गेलेल्या कार्याची माहिती विराज कावडीया यांनी उपस्थितांना दिली. यासोबत संस्थेत ज्यांनी अविरत पणे तन, मन, धनाने कार्य केले. त्यांचा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या या बैठकीत 2017 वर्षासाठीची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. युवाशक्तीची सेकंडलाईन म्हणून सदर कार्यकारिणी कार्यरत असणार आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणीती सदस्य
अध्यक्ष- मंजित जांगिड, उपाध्यक्ष नवल गोपाल व संदीप सुर्यवंशी, सचिव मितेश गुजर, सहसचिव दिपक धनजे, कार्याध्यक्ष तेजस श्रीश्रीमाळ, सहकार्य अध्यक्ष राहुल चव्हाण, खजिनदार तेजस जोशी, सहखजिनदार पियुश तिवारी, समन्वयक सौरभ चतुर्वेदी, भुषण सोनवणे, सदस्य पृथ्वी मैनपुरी, तेजस राजपूत, विनोद सैनी, भवानी अग्रवाल, प्रशांत वाणी, विपिन कावडीया, यश श्रीश्रीमाळ, गणेश भोई, आकाश पारे, रघुनाथ राठोड, गौतम गवळे, कपिल तिवारी, कल्पेश पाटील, समीर कावडीया, तृशांत तिवारी, जय महाले, मोहित शर्मा, प्रणव पाटील, विवेक धर्माधिकारी, कल्पेश श्रीश्रीमाळ, तेजस वांद्रे, जितेंद्र अत्तरदे, महेश भालेराव, विकास अत्तरदे, रोहीत सोनार, हितेश पाटील, पंकज सुराणा, आदींची निवड करण्यात आली आहे.