जळगाव । मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडून पाणीपुरवठा काही कारणास्तव होत नव्हता. यामुळे जळगावकर नागरिकांचे हाल होत होते. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे 4000 लि. क्षमतेचे 11 टँकर पाणी वाटप करण्यात आले. सदर वाटप 6 व 7 जून रोजी करण्यात आले. यामध्ये मुख्यतः तुकारामवाडी, जानकीनगर, गणेशवाडी, लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, रणछोड नगर, ईश्वर कॉलनी या भागात सदर पाणी वाटप करण्यात आले.
सकाळी 6 वाजेपासून ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत पाणी वाटपाचे काम होत होते. यासाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया, तेजस श्रीश्रीमाळ, कल्पेश पाटील, नवल गोपाल, संदीप सुर्यवंशी, भुषण जावळे, आदेश सोनवणे, गणेश सोनार, गणेश भोई, अमित जगताप, विपीन कावडीया, यश श्रीश्रीमाळ, समीर कावडीया, राहुल चव्हाण, दीपक धनजे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एका टँकरला 4 हजार लिटर पाणी वाटप करण्यासाठी दिड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. पाणी वाटपामुळे नागरिकांना तुर्त स्वरुपात दिलासा मिळाला आहे व मुलभूत कामांसाठी पाण्याची उपलब्धता युवाशक्तीतर्फे करुन देण्यात आली.