युवासेनेतर्फे पक्ष्यांसाठी दाणापाणी अभियान

0

जळगाव । दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर हे निसर्गरम्य वातावरणांनी नटलेले आहे. मात्र तापमानात वाढ झाल्याने या ठिकाणी असलेल्या पक्षांना वाचविणे आव्हानात्मक ठरत आहे. उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी तसेच खाण्यासाठी व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने युवासेनेमार्फत विद्यापीठामध्ये पक्षांसाठी दानापाणी अभियान राबविण्यात येत आहे. बुधवारी 3 मे रोजी या अभियानास सुरवात करण्यात आली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते झाडावर परळ लावुन अभियानास सुरुवात करण्यात आले. या अभियानात विद्यापीठ परिसरात पक्षांसाठी पाण्याचे परळ लावले जाणार आहे. सुरवातीला 30 परळ लावले जाणार असून दुसर्‍या टप्प्यात 20 परळ लावले जाणार आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रितेश ठाकूर, उपशहर प्रमुख विनायक कोळी, सुरज तायडे, अंकित कासार, प्रितम देवरे, घनश्याम काकडे, विशाल सोनवणे तसेच विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.