युवासेनेतर्फे विधानसभा नवमतदारांची नोंदणी

0

भुसावळ । शहर शिवसेना-युवासेनेतर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या निवडणुकीची तसेच विधानसभा नवमतदार नोंदणी जनाजगृती कार्यक्रमाची सुरुवात ऊंट मोहल्ला, विठ्ठल मंदिर वॉर्ड येथून करण्यात आली. परिसरातील सर्व पदवीधर तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदविल्यास त्यांना प्रा. धीरज पाटील यांच्यातर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे. तरी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. जगदीश कापडे, जेष्ठ शिवसैनिक अबरार शेख, शहर प्रमुख मुकेश गुंजाळ, प्रा. धीरज पाटील, नमा शर्मा, युवा शहर अधिकारी मिलींद कापडे, चिटणीस सुरज पाटील, शिवाजी दाभाट, राहूल सोनटक्के, स्वप्नील पवार, अनुराग शर्मा, शुभम शिंदे, अक्षय जगताप, महेश जाधव, नाना सराफ, राजेश सपकाळे तसेच जेष्ठ नागरिक डिगंबर सराफ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

नोंदणीचे आवाहन
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मातोश्री ई-सेवा केंद्र, उंट मोहल्ला येथे 2 जुलै पुर्वी जमा करण्याचे तसेच भुसावळ विधानसभा मतदार संघात 18 वर्षे पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नावे नोंदविण्याचे आवाहन युवासेना अधिकारी मिलींद कापडे यांनी केले आहे.