’युवास्पंदन भित्तीपत्रकाचे’ उद्घाटन

0

हडपसर । विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच साहित्य व कला, संस्कृती, लेखन, वाचन यांच्या सवंर्धनासाठी रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये युवास्पंदन भित्तीपत्रक सुरू करण्यात आले आहे. प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ नुकताच मंगेश तुपे यांच्या हस्ते पार पडला.

विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, विषयक कौशल्यांना संधी मिळावी हा मुख्य उद्देश ठेऊन हे भित्तिपत्रक महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. तसेच कॉलेजमध्ये नियमित होणार्‍या विविध उपक्रमांना विविध प्रकारच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी तर मिळत असतेच पण त्याच बरोबर स्वतंत्र महाविद्यालयाचे वृत्तपत्र असावे व त्यातून विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळावी यासाठी ’एस. एम. टाईम्स’ हे वृत्तपत्र कॉलेजच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणार आहे. या एस. एम. टाईम्सचे उद्घाटन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दशरथ जाधव, अभिजित तुपे, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, युवास्पंदन भित्तीपत्रकाचे चेअरमन डॉ. लांडे एस. डी, डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. बेबी खिलारे, डॉ. एस. डी. मिसाळ, प्रा. नम्रता मेस्त्री आदि मान्यवरांसह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.