युवा आविष्कार प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

पिंपरी चिंचवड – युवा आविष्कार प्रतिष्ठान प्रणित
आई तुळजाभनी मंदिर ट्रस्ट च्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव २०२० निमित्त रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. बिजलीनगर येथे तुळजाभवानी मंदिर परिसरात शिवनगरी बॉईज यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८८ दात्यांनी रक्तदान केले. तत्पूर्वी, मंडळाचे अध्यक्ष प्रज्योत धुमाळ, उपाध्यक्ष ऋषिकेश उत्तेकर, अजय नरवाडे, आशुतोष कातवरे, संकेत शेळके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन झाले.सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत शिबिर पार पडले.

वायसीएम रुग्णालयातील डॉ. रिचा शर्मा, डॉ. आम्रपाली गायकवाड, डॉ. अर्शद खान, वार्डबॉय राजू मिटकरी यांच्या वैद्यकीय टीमने रक्त पिशव्यांचे संकलन केले.  शिबिरासाठी कल्पेश चौधरी, रवी हेळवर, समीर दातार, आकाश राठोड, शुभम जाधव, विजय जाधव, उमेश अहिरराव, रोशन राणे, अभिजित भालेराव, अनिकेत जाधव, चिदानंद कांबळे, अमोल सोनवणे, ओंकार भोसले, निलेश चौगुले, अक्षय होले, दत्ता होले, जीवन ढवण आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.