पुणे : देशाचा तरुणवर्ग कुशल व तत्पर असेल तर देशाची प्रगती होते. कौशल्य विकास योजनांसारख्या उपक्रमांत जर तरुणांनी सहभाग घेतला तर तरुणांची प्रगती होईल. त्यामुळे कौशल्य विकास योजनांना सर्वाधिक महत्त्व आहे, असे मत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.
नर्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटतर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रसिका कुलकर्णी, मदन घेघाटे, शार्दुल जाधवर, प्राचार्य डॉ. दीपक भामरे, सुजाता सावंत, मेन्नुदिन कुमठे आदी उपस्थित होते.