युवा क्रांती रथाचे रावेरला स्वागत

0

रावेर– अखिल विश्‍व गायत्री परीवार हरिद्वारतर्फे व्दारका ते नागपूर युवा क्रांती रथ निघाला असून शहरात त्याचे आगमन झाल्यानंतर स्वागतानंतर मिरवणूक काढण्यात आली. मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरहुन ही रथ यात्रा येथील स्वस्तिक टॉकीज जवळ आली. उपस्थितानी या रथाचे पूजन केले. भजनी मंडळासह रथाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गायत्री परीवाराचे डॉ.आर.जे.पवार, सुनील देसले, कांतीलाल महाजन, भगवान चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेविका शारदा चौधरी, मेघा भागवत, कपिल महाराज, सुनील अग्रवाल, शैलेन्द्र अग्रवाल, उमेश महाजन, मनोज श्रावक, दिलीप पाटील, उमेश पाटील, प्रशांत दाणी, भास्कर महाजन यांच्यासह गायत्री परीवारच्या महिला व भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकानी रथाचे पूजन केले. पी.ए.तात्या पाटील मार्केटमध्ये सांगता झाली.