युवा नेते अमोल शिंदे यांचा भाजपात प्रवेश

0

पाचोरा । आज युवा नेते अमोल शिंदे यांनी भाजपामध्ये तालुक्यातील प्रमुख व्यक्तींसह प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री ना. गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांच्या सोबत उद्योजक संजय पाटील, राष्ट्रवादीचे माजी जि.प. सदस्य संतोष चौधरी व प्रमुख कार्यकर्ते होते. आगामी काळात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे व ना. महाजन यांनी पाचोरा येथे मेळाव्यासाठी येण्याचे संकेत दिले असून अमोल शिंदे भाऊ आगामी काळात राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांना मोठे राजकीय धक्के देणार असल्याची माहिती अमोल शिंदे यांनी यावेळी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

लवकरच नगरसेवकांसह सरपंचही घेणार
बर्‍याच दिवसांपासून भाजपात प्रवेश घेणार असल्याचा विचार होता. आज जलसंपदामंत्री यांच्य उपस्थितीत प्रवेश केला. येत्या काही दिवसात जनाधार आघाडीचे आजी माजी नगरसेवक व सरपंच असे एकुण 35 जण भाजपा प्रवेश करणार असून जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच वरीष्ठांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याची सभा घेणार आहे. तसेच अजूनही एका बाजूने पक्ष प्रवेश सुरू आहे.