युवा पिढी म्हणजे उद्याचे भवितव्य

0

शिक्रापूर । सध्याची युवा पिढी ही अत्यंत हुशार आहे. लहान लहान मुलांमध्ये कित्येक कला असून युवा पिढी म्हणजे उद्याचे भवितव्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर येथील बालकलाकार तसेच चाणक्य बुद्धी असलेला यश दौंडकर याने नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यश हा 5 वर्षांचा मुलगा जगातील सर्व देशांच्या राजधान्या, राज्यांच्या राजधान्या, राज्यांचे मुख्यमंत्री, थंड हवेची ठिकाणे, अष्टविनायक, जगातील आश्चर्य, ग्रह यांसह आदी माहिती अगदी काही सेकंदात सांगतो. त्याच्याकडे असलेल्या आकलन बुद्धी क्षमतेचे अण्णांनी कौतुक केले. लहान मुले अशा पद्धतीने समाजापुढे आदर्श निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यशला अण्णांनी शुभेच्छा दिल्या असून त्याच्या उत्तरांनी अण्णा देखील भारावून गेले. यावेळी यशचे पालक राजेंद्र दौंडकर, छाया दौंडकर, जातेगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन बढे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष शेरखान शेख उपस्थित होते.