युवा फाऊंडेशनने राबविले ‘स्वच्छ भारत अभियान’

0

चोपडा । येथील स्वामी विवेकांनद युवा फाऊंडेशन व गुरुदत्त मित्र मंडळ सेवकांनी मकरसंक्रांती दिनी चोपडा शहरातील छ.महाराज शिवाजी चौक व पुतळा परिसर डॅ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक व इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करुन कचरा गोळा केला व याग्य विल्हेवाट लावून एक आगळी वेगळी मकरसंक्रांती साजरी केली.

शहर स्वच्छ असल्यास नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल या उद्देशाने उपक्रम राबविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत निर्मल भारत अभियानास खारीचा वाटा लावण्याचा व समाजात एक चांगली संवयीची प्रेरणेपोटी शहरातील स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन व विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरात थोर नेते व महाराष्ट्राचे प्रेणेते शिवछत्रपती राजे यांच्या सभोतालच्या परिसरात जावून झालेले घाणीचे सामराज्य समुळ नष्ट केले.

तालुक्यात जनजागृती करून केली पथनाट्य
विशेष करुन छ.शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना स्वच्छ धुवून पूजन व माल्यार्पण करुन झाडून कचरा योग्य विल्हेवाट लावून स्वच्छता अभियान युवकांनी राबविला. आरोग्याबाबत आणि स्वच्छतेबाबत नियमित नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, शिस्त लागावी या उद्देशाने शहरात स्वच्छता करण्यात आली. त्या तालुक्यातील शाळांमध्ये ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेचा संदेशाचे फलक व बॅनर लवकरच लावण्यात येणार आहे. या आधीही फाऊंडेशनमार्फत ग्रामीण भागात, तालुक्यात आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण विषयांवर शिबिर पथनाट्य, पत्रकेद्वारे (पॉपलेट) जनजागृती केलेली आहे व करत आहे. यात परिसरातील नागरिकांचा सहभाग लाभला. अभियानास पुर्तीस भूषण लोहार, आकाश माळी, कैलास निकम, हेमंत माळी, परमानंद पाटील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. युवकांच्या कामाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.