युवा मंच संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम

0

धुळे। सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात कार्य करणार्‍या युवा मंच या संस्थेतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. आता आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. तो म्हणजे अवयदान उपक्रमांतर्गत फार्म भरून घेण्याचा हा उपक्रम होय, अशी माहिती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र देसले यांनी आज पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पुढील महिन्यात भव्य रक्तदान शिबिर : देसले
गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. मागे मल्लखांब विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच धुळ्यातील अजीत राठोड यांनी रुपउंड 16000 फुटावर बर्फावर ट्रॅकींग केली. या विद्यार्थ्यास देखील जितेंद्र देसले यांनी ट्रेनिंग दिली आहे. आता पुढील महिन्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच अवयवदान करण्याबाबतचे फार्म भरून घेण्याचा आगळा-वेगळा उपक्रम युवा मंचच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी डॉ.आनंद जावकर, डॉ.स्वप्नील सारडा, डॉ.शरद देसले यांचे सहकार्य लाभत आहे.