जळगाव : युवा विकास फाऊंडेशन संचलित सि.ग. भंगाळे माध्यमिक व अप्पासाहेब जे.एस.शिंदे प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार चंदुभाई पटेल होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर ललित कोल्हे, ग.स.सोसायटीचे उपाध्यक्ष महेश पाटील, नगरसेविका ज्योती इंगळे, नगरसेविका शितल चौधरी, आयएमए सेंट्रल वर्किंग कमिटी दिल्लीचे मेंबर डॉ. स्नेहल फेगडे, केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल झंवर, उपाध्यक्ष श्याम वाणी, एक्झीकेटीव्ह कमिटी मेंबर संजय तिवारी, सल्लागार समितीचे दिनेश मालू, एक्झीकेटीव्ह कमिटी मेंबर राजेंद्र पाटील, भुसावळ शिक्षक पतपेढीच्या संचालिका प्रसन्ना झोपे, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, संस्थेचे सवि भोजराज राडे, संस्थेच्या संचालिका जे.डी.सी.सी. बँक संगीता भंगाळे, लिना चौधरी, अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज वाणी, युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश अत्तरदे, शहर जिल्हाध्यक्ष बिपीन झोपे, युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके, सामाजिक कार्यकर्ते विवेक महाजन, हेमंत पाटील परिसरातील गुलाबराव पाटील, सुहास बोरोले, लक्ष्मण धांडे, रामदास पाटील, पुरुषोत्तम सोनवणे, ठाकूर काका, संजय बेलदार आदी उपस्थित होते.
विविध स्पर्धेंतील यशस्वीतांचा गौरव
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक विष्णू भंगाळे यांनी केले. त्यांनी शाळेची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती विषयी माहिती सांगितली. मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सत्यम शिवम् सुंदरम्, झिंज झिंग झिंगाट, कृष्ण जन्मा ग बाई, खेळ मांडला, छम, छम, छम अशा विविध गाण्यांद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकून मिळवली यावेळी पालकांची उपस्थिती होती.