नवी दिल्ली । भारताच्या 17 वर्षांखालील फुटबॉल संघाला एका सराव सामन्यात पोर्तुगालचा स्थानिक संघ एस्टोरिलविरुध्द 1-4 असा पराभव पत्करावा लागला. आठव्या मिनिटाला मोंटेरोने गोल करुन एस्टोरिलने आघाडी घेत वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. वेलेजने 33व्या मिनिटाला गोल करुन एस्टोरिलची आघाडी 2-0 अशी केली. दडपणाखाली आलेल्या भारताकडून अनेक चुकाही झाल्या. भारतीय संघाच्या कमजोर बचावाचा फायदा घेत बर्नाडो याने 55व्या गोल करुन एस्टोरिलची आघाडी 3-0 अशी भक्कम केली.