युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा रद्द

जळगाव : शिवसंवाद यात्रेच्या औचित्याने बंडखोर आमदारांच्या गटात मंगळवार व बुधवारी माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा होणार असल्याने त्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून असतानाच प्रकृती अस्वास्थामुळे ठाकरे यांचा 8 आणि 9 ऑगस्ट रोजीचा नियोजित जळगाव जिल्हा दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये यांनी दिली आहे.

लवकरच जाहीर होणार दौर्‍याची तारीख
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहे. मुंबईसह बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. पहिला टप्प्यात मराठवाडा, दुसरा टप्पा कोकण आणि तिसरा टप्प उत्तर महाराष्ट्र असा दौरा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान पहिला आणि टप्प्यात मराठवाडा आणि कोकण येथे आदित्य ठाकरे यांनी दौरे केले. त्यानंतर तिसर्‍या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात होता. यात जळगाव जिल्ह्यात 8 आणि 9 ऑगस्ट रोजी धरणगाव आणि पाचोरा मतदार संघात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार होते परंतु आदित्य ठाकरे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा नियोजित दोन दिवसीय जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद दौर्‍याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनाचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.