युवा सेनेतर्फे शालेय साहित्याचे वाटप

0

करंडोली-युवा सेनेच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात युवा सेनेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंडोली येथील युवा सेनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, खंडू शेलार, नितिन देशमुख, रोशन येवले, बाळा येवले, आकाश शेवाळे, निखिल चांदणे, रूपेश येवले, अक्षय हुलावळे, प्रविण चांदणे, राहुल चांदणे, दिनेश काशिकर, हेमंत देशमुख, अनुज दहिभाते, वैभव देशमुख, आदित्य शेलार, स्वप्निल बैकर, सनी शेलार, अजय शेलार, अजय वाळुंज, सुरज चांदणे, उमेश काशिकर, सोमनाथ भाटवडेकर उपस्थित होते.