हैद्राबादमधील एका सरकारी प्रयोगशाळेत चीनी कंपनी अलिबाबाच्या युसी ब्राउझरची चौकशी सुरू आहे. ब्राउझर भारताचा डेटा चोरून चीनला पाठवित आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे. चीनमध्ये तयार झालेल्या स्मार्टफोननंतर तेथील कंपन्यांच्या मोबाईल एपवर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. युसी ब्राउझरने युझर्सचे मोबाईल नंबरही चीनमध्ये पाठविले आहेत. आयएमएसआय (आंतरराष्ट्रीय मोबाईल ग्राहक ओळख) आणि आयएमईआय ( आंतरराष्ट्रीय मोबाईल सेट ओळख) हे चीनमधील सर्व्हरला पाठविण्यात आले आहेत.
हैद्राबादेतील सी डॅकच्या प्रयोगशाळेत जर का यूसी ब्राउझर भारतीयांचा डेटा चोरत आहे, असे लक्षात आले तर सरकार एपविरोधात कडक कारवाई करू शकते. गुगल क्रोम जगात सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे. मात्र भारत, चीन आणि इंडोनेशिया या जास्त लोकसंख्येच्या देशांमध्ये यूसी ब्राउझर सर्वाधिक वापरला जातो.