भडगाव । कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक, माध्यमिक दादासो. सु.मा.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अजय अरुण पवार हे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांची असिस्टन्ट कमांडंटपदी नियुक्ती झाल्याने त्यांची मिरवणूक काढण्यात आली. अजय पवार यांचा सत्कार दहावी बारावीच्या निरोप समारंभाप्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी बबन तडवी, बीडीओ सुभाष जाधव, अजय पवार यांनी केले.