नवी दिल्ली-केंद्रीय सेवा स्पर्धा परीक्षांच्या प्रीलिमचे निकाल १५ जुलैच्या सुमारास लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातली सूचना संकेतस्थळांवर लवकरच झळकण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय स्पर्धा परीक्षांच्या प्रीलिम्स जून ३, २०१८ रोजी घेण्यात आल्या होत्या. आयएएस, आयपीएस, आयएफएस व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अन्य सनदी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी या परीक्षा घेण्यात येतात. प्रीलिममध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.
आत्तापर्यंतचा कल असा आहे की, परीक्षा झाल्यानंतर ४० ते ४५ दिवसांमध्ये निकाल घोषित केला जातो. त्यामुळे १३ ते १५ जुलैच्या सुमारास यंदा हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अधिकृतरीत्या कळवण्यात आले आहे की २०१८ची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल. युपीएससी सीएसच्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून प्रीलिम्सच्या निकालांसाठी युपीएससीच्या वेबसाईटवर लक्ष ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.
युपीएससीची मुख्य परीक्षा २८ ते ३० सप्टेंबर व ६, ७ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातले संपूर्ण वेळापत्रक वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे. 2018 मध्ये उत्तीर्ण होतील ते नंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरणार आहेत.