लखनौ-उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरुन जाळपोळीची घटना घडली. यात यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अवैध कत्तलखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी येथील पोलीस स्टेशनला पेटवून दिले. तसेच मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्यानंतर एका पोलीस व्हॅनला आग लावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात यामध्ये येथील पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह इतर दोन जणांचा यात मृत्यू झाला आहे.
स्यानामधील एका गावातील शेतामध्ये गोमांस आढळून आल्याने त्याविरोधात लोकांनी आंदोलन पुकारले. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी गोळी चालवली. यामध्ये एक तरुण गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर अनियंत्रित जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या एका तरुणाचा मेरठमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला.