लखनौ-उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरचा हिंसाचाराची घटना अद्याप ताजी असतांना आता पुन्हा उत्तर प्रदेशात जमावाच्या हिंसाचारात आणखी एका पोलिसाचा बळी गेला. गाझीपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर परतणाऱ्या वाहनांवर निदर्शकांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस शिपाई ठार झाला. सुरेश वत्स (४८) असे त्याचे नाव आहे.
राष्ट्रीय निषाद पक्षाचे कार्यकर्ते नौनेरा भागात पोलीस ठाण्याजवळ निदर्शने करत होते. पोलिसांनी त्यांना सभास्थळी जाण्यापासून रोखले होते.
सुरेश वत्स हे पोलीस शिपाई वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरेश यांच्या पत्नीला ४० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
देशात पोलिसच सुरक्षित नाही
मृत पोलीस शिपाई सुरेश वत्स यांचा मुलगा व्ही.पी.सिंह यांनी या देशात जर पोलिसच सुरक्षित नसतील तर आपण पोलिसांकडून सुरक्षिततेबाबत काय अपेक्षा करू शकतो, अशा शब्दात प्रतिक्रिया देत तीव्र निषेध नोंदविला आहे.
VP Singh, son of deceased constable Suresh Vats who died in Ghazipur in a stone pelting incident y'day: Police is not being able to protect their own. What can we expect from them?What will we do with compensation now?Earlier,similar incidents took place in Bulandshahr&Pratapgarh pic.twitter.com/2xgarpIDXB
— ANI UP (@ANINewsUP) December 30, 2018