भोपाळ-मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी युपी-बिहारी लोकांमुळे मध्य प्रदेशमधील नागरिकांना रोजगार मिळत नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून कमलनाथ यांच्यावर टीका होत आहे. मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले आहे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची योजना मध्य प्रदेशासाठी काही नवी नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मध्य प्रदेशात ना कोणी इकडचा आहे ना तिकडचा. मध्य प्रदेशात जो कोणी येतो तो इकडचाच होऊन जातो. मध्य प्रदेशला भारताचं ह्रदय असंच नाही म्हटलं जात. काय योग्य बोललो ना?’ असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.