रावेर । 2014 च्या निवडणुकीत अंगावर येणार्यांचा 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या नरडीचा घोट घेऊ असा घाणाघात शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केले. याबाबत वृत्त असे रावेर विधानसभा व लोकसभा मतदार संघाचा शिवसेना कार्यकर्ते मेळावा आज झाला. यावेळी सहकार मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, यावल नगराध्यक्ष सुरेखा कोळी, नगरसेवक प्रल्हाद महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, संपर्क प्रमुख रविंद्र पारकर, तालुकाध्यक्ष योगराज पाटील, भाऊ पाटील यांच्यासह मोठ्या संखेने युवासैनिक शिवसैनिक संपर्क प्रमुख महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.