मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध मेट्रो मार्गाचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे नेते एका व्यासपीठावर आल्याने युतीचे संकेत दिसत आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचीच सरकार येईल असे मोदी आणि फडणवीस यांच्यासमोर सांगितले. यावरून उद्धव ठाकरे यांनी युती होणार असे संकेत दिले आहे. जे करायचे ते दिलखुलास करायचे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सत्तेची आम्हाला हाव नाही परंतु जनतेच्या विकासासाठी पुन्हा युतीची सरकार आवश्यक असून पुन्हा महाराष्ट्रात युतीचीच सरकार येईल असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मिरातील कलम ३७० रद्द केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.