येत्या काही तासात जळगावला मुसळधार पाऊस?

0

जळगाव: गेल्या आठवड्यात जळगावात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर आता येत्या काही तासात जळगावात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. एएनआयने याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत येत्या ३ तासांत मुसळधार तसेच अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.