पुणे : लोकसभा निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. चालू आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे वातावरण अधिकच ढवळून निघेल.
फेब्रुवारी महिना राजकीय पक्षांसाठी अधिक धांदलीचा आहे. पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. तत्पूर्वी संघटना बांधणी करणे, प्रचार फेर्या काढणे यात नेते गुंतले आहेत. भाजप आणि काँग्रेस यांनी तर बूथ कमिट्या बांधणीवर लक्ष दिले आहे. भाजपने बूथ कमिटी मेळावा आयोजित केला असून 9 तारखेला अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस पक्षाने जनसंपर्क मोहीम आखली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राज्यात 50 सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा पुण्यात आठ तारखेला होणार आहे.