येत्या विश्वचषकासाठी संघ तयार करण्याची वेळ

0

कराची । वेळ आली आहे की, निवडकर्त्यांनी 2019 विश्वचषकासाठी विचार करून संघ निवडण्याचे काम सुरू केले पाहिजे. असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता इजमाम उल हक यांनी पत्रकार परिषदमध्ये म्हणाल की, 2019 चा विश्व चषक आमचे लक्ष आहे.

2019 चा विश्वचषक आमचे लक्ष असल्याचा केला दावा
आमच्या कडील असलेल्या क्रिकेट पटूमधून 2019 मध्ये होणार्‍या विश्वचषक संघात कोण कोण आपले स्थान निश्‍चित करू शकतो. पाकिस्तान संघ शारजाह, न्युझिलंड, आणि ऑस्ट्रोलिया यांच्या सोबत झालेल्या सहा कसोटी सामन्यात झालेला पराभव त्याचबरोबर एक दिवसीय सामन्यातील खराब प्रदर्शन केल्यावरही संघात मोठे बदल करण्यात येतील या संभावनेला त्याने स्पष्ट नकार दिला आहे.इंग्लंड व आस्ट्रोलिया बरोबर झालेल्या एक दिवसीय मालिकेत 1-4 ने पराभव पत्कारावा लागल्याने पाकिस्तान संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. यावेळी पत्रकारांनी कसोटी कर्णधार मिसबाह उल हक या बद्दल विचारले असता इंजमाम म्हणाला की, यात काहीच शंका नाही की या सिनियर फलंदाजाचे पाकिस्तान क्रिकेट मध्ये त्याचे एक स्थान आहे.