येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन
दिनांक 16 सप्टेंबर 2023 वार शनिवार..
शहादा – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे दि.16 सप्टेंबर 2023 वार शनिवार रोजी मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखती) चे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात राज्यातील बडोदा येथील नामांकित सन फार्मासुटीकल मेडिकेअर लिमिटेड कंपनीचे अधिकारी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) घेण्यासाठी येणार असून त्यामध्ये प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स, मायक्रोबायोलॉजी विभागात सुपरवायझर व ऑपरेटर ह्या पदांसाठी विद्यार्थ्यांची पूल कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात येणार असून नोकरी चे ठिकाण बास्का, बडोदा आहे. ज्या विद्यार्थ्यांची पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (मुलाखतीमध्ये) निवड होईल अशा विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे चांगले व उत्तम पॅकेज दिले जाणार असून त्यासाठी पात्रता डी.फार्मसी, बी.फार्मसी, एम.फार्मसी, बी.एस.सी., एम.एस.सी. (केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी), डिप्लोमा पॉलिटेक्निक (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅट्रानिक्स) अनिवार्य आहे. जे विद्यार्थी मागील शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झाले आहेत ते विद्यार्थी ह्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात. सदर इंटरव्ह्यूमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करावे. परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थीयांना चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून त्यांना नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकंती नाही करावी लागणार ह्या दृष्टीने, उद्देशाने सदर कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचा (मुलाखत) लाभ घ्यावा असे आव्हान पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या विषयी काही माहिती किंवा अडचण आल्यास त्यांनी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.जवेश पाटील (मो.नं. 9923441004) यांच्याशी संपर्क साधावा. सदर मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू दि. 16 सप्टेंबर 2023 वार शनिवारी सकाळी 9 वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, अंतिम वर्षाचे गुणपत्रक किंवा पदवी प्रमाणपत्र तसेच 2 फोटो व बायोडाटा सोबत घेऊन यावे.