पुणे । गणपती हे खास करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असले तरी सर्व जाती-धर्माचे लोक गणेशोत्सवात सहभागी होतात. असाच एक आगळा-वेगळा अनुभव म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष सनमित सिंग चौधरी यांच्या घरी श्रींचे उत्साहात आगमन झाले आहे. वयाच्या तिसर्या वर्षांपासून सनमित सिंग कायमस्वरुपी संगमरवरीमूर्तीसोबत शाडूच्या मूर्तीची मनोभावे प्राणप्रतिष्ठा करत आहेत. बाप्पाच्या समोर आरस करून दरवर्षी विविध देखावे साकारतात. त्यांच्याकडे श्रींच्या दर्शनासाठी सर्व धर्माचे मित्र येत असतात. श्रींचे विसर्जन घरीच गुलाबपाण्यात करून कुंड्यांमध्ये लावलेल्या रोपांसाठी ती वापरली जाते, असे सनमित सिंग चौधरी सांगतात.