सांगली-महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सांगलीत आता सुरुवात झाली आहे. उमेदवार याद्या निश्चित झाल्यावर प्रचारात रंगत येणार आहे. प्रचारासाठी मोठी अडचण असते ती कार्यकर्त्यांची. त्यामुळे अनेकांच्या पाया पडून, वेगवेगळे आमिष दाखवत उमेदवार आपल्या प्रचारासाठी फौज उभी करत असतो. मात्र आता प्रचारासाठी वेगळा फंडा लडविण्यात आला आहे. प्रचारासाठी माणसे भाड्याने मिळणार आहे. अशाच आशयाची जाहिरात सांगलीतील एका बोर्डावर करण्यात आली आहे. ‘आत्ताच सावकार व्हा.’ अशा मथळ्याखाली प्रचारासाठी मुल भाड्याने मिळतील असे एका बोर्डावर लिहिण्यात आले आहे. प्रचारासाठी हजेरीमागे एक हजार असा दरही जाहीर करण्यात आला आहे.
सोबतच मोबाईल क्रमांक ही देण्यात आला आहे. सांगलीतील हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथील बोर्डावर हा मजकूर लिहिण्यात आला आहे. या अजब जाहिरातीची सध्या सांगलीत जोरदार चर्चा सूरू आहे.