पाचोऱ्यातील दोन मुलांचा हिवरा नदी डोहात बुडून मृत्यू

0

पाचोरा: शहरातील जारगाव चौफुली लगत असलेल्या नुरानी नगरमधील दोन मुलांचा हिवरा नदी डोहात बुडून मृत्यू झाला. असताजुनेर अनिस बागवान (१३), शाहीद अब्जलपिंजारी (१४) असे मयत मुलांचे नाव आहे.

तीन मुलं पोहण्यासाठीहिवरा नदी डोहात गेले. दोघांनी उडी घेतल्यानंतर तिसरा घराकडे आला. त्याने घरी आल्यानंतर दोघ बुडल्याचे सांगितले.

त्यानंतर शोध घेतला असता जुनेर पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. शाहीदचा शोध सुरू आहे. जुनेरच्या मृतदेहावर वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे यांनी शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.