येरवडा करागृहात डीएसकेंच्या मेहुणीची चौकशी

0

पुणे । डी. एस. कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना गुरूवारी आर्थिक गुन्हे शाखेने येरवडा कारागृहात आणले. यावेळी डी. एस. कुलकर्णी आणि या प्रकरणातील इतर आरोपींसमोर त्यांची चौकशी करण्यात आली. गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनुराधा पुरंदरे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना चार जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

43 कोटी रुपयांची फसवणूक
पोलिस कोठडी दरम्यान अनुराधा पुरंदरे यांची डीएसके आणि इतर आरोपींसमोर चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी गुरूवारी दुपारी अनुराधा पुरंदरे यांना येरवडा कारागृहात घेऊन गेले. गुंतवणूकदार, बँक आणि डिबेंचर्स यांची दोन हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, डीएसकेंची पुतणी सई वांजपे, सई वांजपेचा नवरा केदार वांजपे, कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना या आधीच अटक करण्यात आली आहे.