येरवडा परिसरात रंगला दहीहंडी उत्सव

0

येरवडा : विमाननगर येथील अशोक देवकर चौक येथे अखिल विमाननगर युवा मंचच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी अभिनेत्री शीतल ढेकळे उपस्थित होते. यावेळी युवकांनी अनेक गाण्यांवर ठेका धरत उत्साह साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन मंचचे संस्थापक शंकर देवकर (पाटील) यांनी केले होते. यावेळी जावेद सय्यद, विजय बिराजदार, अश्विन देसाई, प्रमोद सोरटे, दत्ता देवकर, गुलाब मोलानी, आकाश गाडेकर, विनोद गिरी, सुनील धावणे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवशक्ती गणेश दहीहंडी उत्सव पथकाने हंडी फोडल्याने त्यांना अभिनेत्री ढेकळे, शंकर देवकर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

तक्षशिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमास आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक महेंद्र गलांडे हे उपस्थित होते. यावेळी सिनेतारका फेनील उमरीगर, वाणी शर्मा, स्नेहा कपूर, अनुपम चौहान यांनी यावेळी उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे पाण्याचा फवारा,प्रेक्षकांचा जल्लोष व उत्साह यामुळे परिसर दुमदुमला होता. यावेळी दहीहंडी फोडणार्‍या अष्टविनायक दहीहंडी पथकास सिनेअभिनेत्री वाणी शर्मा व कार्यक्रमाचे आयोजक राहुल भंडारे यांच्या हस्ते ट्रॉफी बक्षीस म्हणून भेट देण्यात आली. तर वडगाव शेरी येथे ही पुणे विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार जगदीश मुळीक यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, सुनीता गलांडे व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान अनेक पथकाचे थरावर थर पाहावयास मिळाले. दहीहंडी पाहण्यासाठी विविध उपनगरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने अनेक भागात वाहनचालकांना वाहतूक कोंडीस सामोरे जाण्याची वेळ आली. तर अनेक भागात छोट्या मोठ्या मंडळांच्या वतीने दहीहंडी उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये. याकरिता विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ, चंदननगर पोलीस स्टेशनचे संगीता पाटील, मुकुंद महाजन, संजय नाईक-पाटील, रवींद्र मुळीक यांच्या हस्ते कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.