येरवड्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत

0

ढोल-ताशांच्या गजरात, पावसाच्या साथीने मिरवणुकींनी बाप्पांचे आगमन

येरवडा । येरवडा, वडगाव शेरी, खराडी या भागांत ढोल-ताशांच्या गजरात आणि मेघराजांनीदेखील बाप्पांच्या स्वागतासाठी लावलेली हजेरी अशा भक्तिभावात गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

बाप्पांची प्रतिष्ठापना होत असताना सकाळपासूनच मेघराजांनी हजेरी लावली होती. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी दुकानांनी गर्दी दिसून येत होती. तर अनेक दुकांनाने सजावटीच्या साहित्याने फुलून दिसून येत होती. गणरायांच्या विविध मूर्त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले होते. यावेळी कोणती गणेशमूर्ती खरेदी करावी यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता होती. मिठाईच्या दुकानांत देखील बाप्पांचे आवडते मोदक खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होती. ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या गजराने परिसर दुमदुमला होता. अनेक महिला व बालक हे ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करून घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जात होते. अनेक भागात मंडळांच्या वतीने मंडप उभारून अनेक मंडळांनी विविध प्रकारचे आकर्षित देखावे सादर करण्यासाठी देखाव्याचे काम सुरू होते. तर अनेक मंडळांनी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. शालेय विद्यालय व महाविद्यालयात देखील गणरायाचे जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली.

शांततेत उत्सव पार पाडण्याचे आवाहन
पोलीस स्टेशनमध्ये मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याबरोबरच पोलीस मित्र संघटनेची मदत घेण्यात आली आहे. त्यातच येरवडा परिसरात राष्ट्रीय कस्तुरबा गांधी स्मारक, लोहगाव आंतराष्ट्रीय विमानतळ, येरवडा कारागृह ह्या ऐतिहासिक वास्तू असल्याने गणेशोत्सव काळात काही अनुचित प्रकार घडू नये. याकरिता परिमंडळ4चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी,येरवडा,विमानतळ,चंदननगर आदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संगीता पाटील, मुकुंद महाजन, संजय नाईक-पाटील, राजेंद्र मुळीक ह्या पोलीस निरीक्षकाच्या बैठका घेऊन जर एखाद्या मंडळाविरोधात काही तक्रार आल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश साकोरे यांनी दिले असून याबरोबरच वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात काही अनुचित घटना घडू नये. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून रात्रीच्या सुमारास नाकेबंदी देखील करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक मंडळास गणेशोत्सव शांततेत पार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली साकोरे यांनी केले आहे. त्यातच गौरींच्या स्वागतासाठी देखील महिलांनी देखील जय्यत तयारी सुरू केली आहे.