येरवड्यात मेट्रोचा भुयारी मार्ग व्हावा 

0
कल्याणीनगर रहिवाशांची मागणी
पुणे : नदीपात्र आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यातून जाणारा मेट्रो रेलचा मार्ग व्यवहार्य नसल्याने बदलून गुंजन टॉकीज चौक ते रामवाडी भुयारी मार्ग करावा, अशी मागणी कल्याणी नगर रहिवासी संघाने केली असून आमदार जगदीश मुळीक यांना निवेदन दिले आहे.
पौड रस्त्यावरील वनाज कॉर्नर ते रामवाडी मेट्रो रेलचे काम सध्या जोरात सुरू आहे. मेट्रोच्या मूळ आराखडयात येरवड्यातील आगाखान पॅलेस येथून मेट्रो जाणार होती. परंतु पॅलेस राष्ट्रीय स्मारक असल्याने मार्ग मुठा नदीपात्र, पक्षी अभयारण्य असा करण्यात आला. या मार्गावर प्रवासी जास्त मिळू शकणार नसल्याने तो व्यवहार्य नाही. आणि अभयारण्यातून नेण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. याकरिता गुंजन टॉकीज चौक ते रामवाडी भुयारी मार्ग सुचविला आहे.